Search for:
एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर कौशल्य विकासासह रोजगाराचे केंद्र
एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम, मशनरी प्रतिष्ठापणचे उद्घाटन
 
आजचा युवक हा प्रतिभावंत आहे. नवे कौशल्य आत्मसाद करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मात्र, व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम रोजगारावरही होतो. मात्र आता एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून महिला व पुरूष कारागिरांना कौशल्य विकासासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
 
चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथील सर्च एम्ब्रॉयडरी अँड कांथा स्टीचिंग क्लस्टर फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम व मशनरी प्रतिष्ठापणाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडला.
 
अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, धणोजी कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, अमोल गायकवाड, चंद्रकांत वासाडे, राजेश पेचे, विजय बदखल, दिलीप झाडे आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
 
चंद्रपूर येथे युवा उद्योजग इंजिनिअर, तथा संस्थापक अध्यक्ष इंजी. दिलीप सं. झाडे यांनी दि.25.02.2022 ला सर्च एम्ब्रायडरी अँड कॉथा स्टीचिंग क्लस्टर फाउंडेशन चंद्रपूरची स्थापना करूनअश्या प्रकारचा प्रकल्प सुरू करण्याचे धाडस दाखवल्याबद्धल व यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने स्फुर्ती योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या परिसरातील अनेक होतकरू महिला व पुरुष कारागिरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. याबद्दल जिल्हा स्टेडियम मित्र परिवाराच्या वतीने इंजि. दिलीप झाडे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
यावेळी आमदार किशोरजी जोरगेवार म्हणाले, रोजगार उपलब्धतेसाठी औद्योगिक क्षेत्राची गरज आहे. मात्र औद्योगिकीकरन होत असताना साहजिकच प्रदूषणातही वाढ होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवत रोजगार निर्मिती करता येईल अशा उद्योगांकडे वळण्याची गरज आहे. एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर हा सुरू झालेला उद्योग याचेच एक उत्तम उदाहरण असून, यातून हजारो युवक युवतींच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अश्या उद्योगांना लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी आहे.
त्यांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मध्यमवर्गीयांसह सामान्य कुटुंबाना चांगले उत्पादन मिळावे. आणि परिसरात रोजगार निर्मिती होऊन अर्थार्जन व्हावे, अशी भावना यावेळी बोलतांना व्यक्त केली.
 
यावेळी संचालक मोहन राऊत, संस्थेच्या सी. डी. ई. स्नेहल काटकर, भाजपा महानगर महिला आघाडीच्या सौ. किरणताई बुटले, राजेश नायडू, समस्त कर्मचारी वृंद आदींसह प्रमुख पाहुणे आणि प्रशिक्षणार्थी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नव्या स्वप्नाचे जग …!!!

कोविद च्या काळात आपण सगळेच हादरलो होतो. पण आपली जगण्याची उमेद संपली नव्हती . सर्व उद्योग व्यापार पार ठप्प पडले होतो. पण नव्या स्वप्नांची दिशा काहींना खुणावत होती. त्यातला मी एक होतो.

संन २००५ साली स्कॉलर्स सर्च अकादमी कोरपना या नर्सरी ते १२ वि विज्ञान शाळेची निर्मिती सोबत ३०० मुलांचे हॉस्टेल मला खूप काही अनुभव देऊन गेले. करोनाच्या काळात शाळा बंद झाली. आता काय करावे म्हणून रात्रंदिवस …विचार करीत होतो. आर्थिक फटका खूप बसला होता. डिप्रेशन यायला लागले. पण हरायचे नाही …या उमेदीने नवे स्वप्न रंगवत होतो. माणसाचे स्वप्न कधी संपत नाही. स्वतला जोड प्रचंड मेहनतीची आवश्यक आहे. मला पुन्हा उठून उभे व्हायला खूपच जास्त कष्ट लागणार होतो. ती घेण्याचीही तयारी होती.पण करावे काय सुचत नव्हते. करोनमुळे बाहेर पडू शकत नव्हतो . वेळ निघून जात होता. पण मन शांत नव्हते. दिवसेंदिवस काळजी वाढत होती. जी मेहनत २००५ ला केली तीच करायची वेळ पुन्हा नियतीने माझ्यावर आणली.

म्हाडा चंद्रपूर ला १.५ एकर जमीन घेऊन होती. आपण यावर काहीतरी करावे म्हणून योजना आखायला सुरुवात केली. पुन्हा लागूनच अर्धा एकर मिळाली तर आपला चांगला प्लॅन होऊ शकते असा विस्वास होता.
आता सर्वच नव्याने धावणे म्हणजे खूपच कष्ट होते. आपली सिस्टिम सुद्धा पोषक नाही..अश्यात नवीन करणे म्हणजे आव्हान होते. पण खतरेके खिलाडी झाल्याशिवाय या जगात काय मिळणार ?? रिस्क खूप होती . पण रिस्क घेतल्याशिवाय काही मिळणार नाही …हेही माहित होतो. …
विचार केला..सगळी जुळवाजुळव केली. कंपनी स्थापन केली . मुंबई चे नामांकित ​CS , CA ची निवड केली . प्रयत्नाने सर्व जुळून आले. msme चा स्कीम अंतर्गत एम्ब्रॉयडरी अँड स्टिचिंग क्लस्टर चंद्रपूर साठी प्रस्ताव पाठविला . काही जुन्या मित्रांनी मदत केली . तो पास झाला .स्वतः जवळचे जेवढे आर्थिक होते …ते सर्व लावून एक उत्तम प्रकल्प तयार करायचे ठरविले. आपली बिल्डिंग युनिक असावी म्हणून खूपच कष्ट घेतले. भारतात असा युनिक व सुंदर प्रकल्प तयार करायचे ठरविले. सुरुवातीला राऊंड बिल्डिंग ला अनेक त्रांत्रिक बाबी करताना त्रास झाला . पण हळूहळू त्या निस्तरल्या . भर लाकडाउन च्या काळात प्रकल्प बांधकाम सुरु केले. ४ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ प्रयन्त बांधकाम पूर्ण केले. विक्रमी वेळात ९महिन्यात काम पूर्ण केले. करोना च्या काळात अनेंक प्रॉब्लेम ऑसूनही त्यावर मात केली . त्यानंतर मशीन्स सिलेक्शन करणे फार जिकिरीचे काम होते. ते सुद्धा आपली शक्ती पणास लावून केले. सर्व अडवान्सड मशीन्स आणणे इंस्टाल करणे . चालविणे फार कस लागत होता. आता सर्व काही तयार झाले. उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. गारमेंट मॅनुफॅकटुरिंग ( तयार कपडे बनविणे ) यात पाय टाकला आहे. आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे एकही फोटो विडिओ जनमानसात पाठविले नाही…. आज पहिल्यद्यच आपण सर्वांचे माहितीसाठी हा लेख लिहून नव्या स्वप्नाचे जगात पदार्पण करीत आहे. अजून उदघाटन व्हायचे आहे. लवकरच करीत आहेत. आपण या प्रकल्पला जरूर भेट द्या . एक उत्तम , महत्वाकांक्षी प्रकल्प एका शेतकऱ्याच्या मुलाने निर्माण केला आहे. याचा आपल्या सर्वांना अभिमान असू द्या…!!

इंजि. दिलीप झाडे
चेअरमन
सर्च एम्ब्रॉयडरी अँड स्टिचिंग क्लस्टर फॉउंडेशन चंद्रपूर