एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर कौशल्य विकासासह रोजगाराचे केंद्र
एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम, मशनरी प्रतिष्ठापणचे उद्घाटन
 
आजचा युवक हा प्रतिभावंत आहे. नवे कौशल्य आत्मसाद करण्याची त्यांच्यात क्षमता आहे. मात्र, व्यासपीठ आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात यश संपादित करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. याचा परिणाम रोजगारावरही होतो. मात्र आता एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या माध्यमातून महिला व पुरूष कारागिरांना कौशल्य विकासासह रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
 
चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथील सर्च एम्ब्रॉयडरी अँड कांथा स्टीचिंग क्लस्टर फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टरच्या इमारत बांधकाम व मशनरी प्रतिष्ठापणाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडला.
 
अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे, धणोजी कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, अमोल गायकवाड, चंद्रकांत वासाडे, राजेश पेचे, विजय बदखल, दिलीप झाडे आदी मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
 
चंद्रपूर येथे युवा उद्योजग इंजिनिअर, तथा संस्थापक अध्यक्ष इंजी. दिलीप सं. झाडे यांनी दि.25.02.2022 ला सर्च एम्ब्रायडरी अँड कॉथा स्टीचिंग क्लस्टर फाउंडेशन चंद्रपूरची स्थापना करूनअश्या प्रकारचा प्रकल्प सुरू करण्याचे धाडस दाखवल्याबद्धल व यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्यामुळे मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने स्फुर्ती योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या परिसरातील अनेक होतकरू महिला व पुरुष कारागिरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. याबद्दल जिल्हा स्टेडियम मित्र परिवाराच्या वतीने इंजि. दिलीप झाडे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
 
यावेळी आमदार किशोरजी जोरगेवार म्हणाले, रोजगार उपलब्धतेसाठी औद्योगिक क्षेत्राची गरज आहे. मात्र औद्योगिकीकरन होत असताना साहजिकच प्रदूषणातही वाढ होणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रित ठेवत रोजगार निर्मिती करता येईल अशा उद्योगांकडे वळण्याची गरज आहे. एम्ब्रॉयडरी अँड स्टीचिंग क्लस्टर हा सुरू झालेला उद्योग याचेच एक उत्तम उदाहरण असून, यातून हजारो युवक युवतींच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे अश्या उद्योगांना लोकप्रतिनिधी म्हणून शक्य ती सर्व मदत करण्याची आमची तयारी आहे.
त्यांच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मध्यमवर्गीयांसह सामान्य कुटुंबाना चांगले उत्पादन मिळावे. आणि परिसरात रोजगार निर्मिती होऊन अर्थार्जन व्हावे, अशी भावना यावेळी बोलतांना व्यक्त केली.
 
यावेळी संचालक मोहन राऊत, संस्थेच्या सी. डी. ई. स्नेहल काटकर, भाजपा महानगर महिला आघाडीच्या सौ. किरणताई बुटले, राजेश नायडू, समस्त कर्मचारी वृंद आदींसह प्रमुख पाहुणे आणि प्रशिक्षणार्थी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.